मराठीतलं पहिलं फॉरेन रिटर्न सिंगल साँग!

 Mumbai
मराठीतलं पहिलं फॉरेन रिटर्न सिंगल साँग!
मराठीतलं पहिलं फॉरेन रिटर्न सिंगल साँग!
See all
Mumbai  -  

मुंबई - मराठी सिनेसृष्टीत होणारे असंख्य बदल आपण पाहत आहोत. असाच एक नवीन बदल आपल्याला एका मराठी सिंगल साँगमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडमध्ये आपल्याला अनेक सिंगल साँग पाहायला मिळाले आहेत. या सिंगल साँगची क्रेझ आजच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ही क्रेझ लक्षात घेता निखिल रानडे हा गायक एक रोमॅंटिक सिंगल साँग प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या निखिल रानडे यांनी 'यार' तसेच सावनी रवींद्र यांच्या 'झोका तुझा' या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. पार्श्वगायनाचा छंद जोपासणाऱ्या निखिल यांचा 'इशारा तुझा' हा मराठी म्युझिक सिंगल साँग अल्बम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 'इशारा तुझा' या सिंगल साँगची खासियत म्हणजे हा संपूर्ण अल्बम लंडन येथे चित्रित करण्यात आला आहे. परदेशात चित्रित करण्यात आलेला हा पहिलाच मराठी म्युझिक सिंगल साँग अल्बम आहे. यातल्या सिंगल साँगमध्ये आपल्याला निखिल रानडे आणि प्रियांका ठाकरे- पाटील असे नवीन चेहरे दिसणार आहेत.

प्रेमात पडल्यानंतरच्या पहिल्या भावनेवर आधारित असलेल्या या सिंगल साँगमध्ये पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा या जोडीचा प्रवास आपल्याला पहायला मिळणार आहे. निखिल रानडे या गाण्याविषयी खूप उत्सुक असून, प्रेक्षक 'यार' इतकंच या गाण्यावरसुद्धा प्रेम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ऋषिकेश नेरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रश्मी महागावकर यांनी संगीत दिले असून, खुद्द निखिल रानडे यांनी हे गाणे गायले आहे. राजीव रानडे यांनी आपल्या दिग्दर्शकीय नजरेतून हे गाणं साकारलं आहे.

Loading Comments