आय एम युअर हाफ बेटर - रणवीर सिंग

 Mumbai
आय एम युअर हाफ बेटर - रणवीर सिंग
Mumbai  -  

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यातील घनिष्ट मैत्री तर सर्वांनाच माहीत असेल. हे एकत्र आले की इतकी मस्ती करतात की बाकीच्यांच्या नाकी नऊ आणतात. दोघांमध्ये एवढी मैत्री आहे की दोघे एकमेकांच्या चित्रपटांचे प्रमोशनही करतात. कधी अर्जुन रणवीर सिंगचे चित्रपट शेअर करतो तर कधी रणवीर अर्जुनचे चित्रपट शेअर करतो.

नुकतंच रणवीरने अर्जुनच्या 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाचे प्रमोशन केले. 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटासंदर्भात रणवीरने एक मजेशीर ट्विट केले आहे. 'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अर्जुन श्रद्धाच्या प्रेमासाठी रडताना दिसतोय. यावरच रणवीरने ट्विट केले आहे.

तुला रडताना पाहून मला पण रडू येत आहे बाबा. तिला फक्त तुझा हाफ हिस्सा व्हायचा आहे. मी तुझा हाफ हिस्सा होईन. मी तुझा बेटर हाफ होऊ इच्छितो. तू फक्त रडू नकोस. अशा आशयाचे ट्विट रणवीरने केले आहे.

तर रणवीरच्या या ट्विटला अर्जुन कपूरनेही मजेशीर उत्तर दिले आहे. तू माझा भाऊ आहेस आणि ती माझा प्राण. मी माझ्या भावासाठी माझे प्राणही देऊ शकतो. तू फक्त माझा आहेस आणि कायम राहशील.

Loading Comments