गोलमालच्या शूटिंगची धमाल पुन्हा सुरू


गोलमालच्या शूटिंगची धमाल पुन्हा सुरू
SHARES

मुंबई - विनोदी हिंदी चित्रपटांच्या मालिकेमध्ये अव्वल मानल्या जाणाऱ्या गोलमालच्या चौथ्या भागाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अंधेरी येथील यशराज स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या एका खास सेटवर या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. त्याला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. तत्पूर्वी या चित्रपटाचं कथानक सर्व कलावंतांना ऐकवण्याचा एक कार्यक्रम झाला. त्यास अजय देवगण वगळता इतर सर्व कलावंत उपस्थित होते. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, तब्बू, परिणीती चोप्रा, निल नितीन मुकेश, जॉनी लिव्हर, अश्विनी काळसेकर, मुकेश ऋषी, सचिन खेडेकर, उदय टिकेकर, प्रकाश राज आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईमधील शूटिंग शेड्यूल आटोपल्यानंतर हा चित्रपट हैदराबाद, उटी आणि गोवा येथे चित्रीत होणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल.

संबंधित विषय