प्रियाच्या आवाजात ‘गोलू पोलू’

 Pali Hill
प्रियाच्या आवाजात ‘गोलू पोलू’
प्रियाच्या आवाजात ‘गोलू पोलू’
प्रियाच्या आवाजात ‘गोलू पोलू’
See all

मुंबई - काही दिवसांपूर्वीच प्रिया बापट आणि साई ताम्हणकर यांचा बहुचर्चित वजनदार सिनेमाचं पाहिलं गाणं ' गोलू पोलू ' रिलीज करण्यात आलय. दोन वजनदार महिलांची कथा असलेल्या या सिनेमातील ‘गोलू पोलू’ गाणं प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकर याच्यावर चित्रीत करण्यात आलय. या गाण्याला अविनाश-विश्वजीत यांनी संगीत दिलं असून ओंकार कुलकर्णी यांनी गीत लिहिलं आहे. तर रोहित राऊत आणि प्रिया बापट हिने हे गाणं गायलय. त्यामुळे आतापर्यंत अभिनयातून समोर येणारी प्रिया गायिकेच्या रूपातही समोर आली आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Loading Comments