Advertisement

कोरोनामुळं बंद असलेली 'गोरेगाव फिल्मसिटी' अखेर पर्यटकांसाठी खुली

तब्बल ६ महिने बंद असलेली गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.

कोरोनामुळं बंद असलेली 'गोरेगाव फिल्मसिटी' अखेर पर्यटकांसाठी खुली
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. परंतू, 'मिशन बिगिन अगेन'च्या अंतर्गत मुंबई हळुहळू पूर्वपदावर येत असून, सर्व व्यवसायही खुले होत आहेत. अशातच, तब्बल ६ महिने बंद असलेली गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यापासून 'गोरेगाव फिल्मसिटी' सुरू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर मालिकांचं चित्रीकरण सुरू झालं तरीही फिल्मसिटीतील पर्यटनास परवानगी देण्यात आली नव्हती. ६ महिने 'बॉलीवूड टुरिझम' हा पर्यटन व्यवसाय बंद असल्यानं त्यावर अवलंबून असणाऱ्या चालक, वाहक, सेवक, अभिनेते, अशा ३० कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडाला होता. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून चित्रनगरीतील पर्यटन सुरू करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणं राज्य शासनाला निवेदनही देण्यात आलं होते.

१५ ऑक्टोबरपासून फिल्मसिटी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, करोनाच्या भीतीपायी अजूनही पर्यटकांचा नगण्यच प्रतिसाद मिळत आहे. मागील आठवड्यात केवळ ७ ते ८ पर्यटकांनी चित्रनगरीस भेट दिली असून, कोरोनाच्या धास्तीपायी अजूनही पर्यटक येण्यास घाबरत आहेत.

पर्यटकांसाठी नियम

  • निर्जंतुकीकरण, अंतरनियमांचं पालन, मुखपट्टी, हातमोजे, तापमानाची नोंद या गोष्टी बंधनकारक आहेत.
  • वातानुकूलित बसचे तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे.
  • कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यास पर्यटकांना प्रवेश नाही.
  • अल्पोपाहार देण्यास मनाई करण्यात आली असून पर्यटकांनी घरूनच खाद्यपदार्थ आणावेत.
  • ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच गर्भवती महिला यांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
  • पर्यटकांकडून चित्रीकरणात तसेच कलाकारांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • बसमध्ये ५० टक्के  पर्यटकांना प्रवेश देण्यात आला आहे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement