बॉलीवूड निर्मात्याची दयनीय अवस्था

    मुंबई  -  

    ओशिवरा - अभिनेता अक्षय कुमारला ब्रेक देणारे निर्माता रवी श्रीवास्तव दयनीय अवस्थेत राहातायेत. रवी श्रीवास्तव यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यात. त्यांचाकडे उपचारांसाठी पैसे नाहीत. अजय देवगण, रोनित रॉय, परेश रावल, अक्षय कुमार अशा कलाकारांना रवी श्रीवास्तव यांनी बॉलीवूडमध्ये काम दिलं. पण उतरत्या काळात त्यांच्या पाठिशी आज कुणीही उभं नाही. अक्षय कुमार तर फोनही उचलत नसल्याची खंत रवी श्रीवास्तव यांनी मुंबई लाइव्हशी बोलून दाखवली. 14 वर्षाचे असताना रवी श्रीवास्तव यांनी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. मोठ्या संघर्षानंतर रवी यांना एका चित्रपटात पब्लिसिटी डिझायनरचं काम मिळालं. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांची पोस्टर आपल्या हातानं डिझाइन केली आहेत. निर्माता म्हणून 1991मध्ये 'द्वारपाल'च्या चित्रिकरणाला त्यांनी सुरुवात केली. पण 1992मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटामुळे चित्रपट कधी पूर्णच होऊ शकला नाही. त्यामुळे श्रीवास्तव यांची आर्थिक स्थिती बिकट झाली.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.