Advertisement

बिग बॉस - ११मधले वाद संपता संपेनात!


बिग बॉस - ११मधले वाद संपता संपेनात!
SHARES

'बिग बॉस' हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असणारा शो आहे. सध्या ही 'बिग बॉस ११'च्या घरात बरेच वाद होऊ लागले आहेत. रॅपर आकाश ददलानीला धक्का मारला म्हणून 'बिग बॉस ११'मध्ये सलमानने प्रियांक शर्माला बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण आता प्रियांक शर्माने घरात वाइल्ड कार्ड एंट्री केली आहे. प्रियांकच्या पुन्हा येण्याने घरामध्ये सगळे जण खूश झाले आहेत. पण प्रियांकने आल्या आल्या स्वतःसाठी अडचण निर्माण केली आहे.

 


शुक्रवारच्या भागात सपना आणि अर्शी या दोघींमध्ये भांडण सुरु असताना प्रियांकने हळूच सपनाला सांगितलं की, अर्शीच्या समोर 'गोवा आणि पुणे', असं ओरड. असं सांगितल्यावर सपनाने प्रियांकने सांगितलं तसंच केलं. ते ऐकून अर्शी रडायला लागली. आणि तिला आश्चर्य वाटलं, की सपनाला या गोष्टींबद्दल कसं माहीत पडलं.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार अर्शी खानच्या पब्लिसिटी टीमने अशी माहिती दिली आहे, की 'अर्शी खान बिग बॉस ११ के प्रतियोगिता प्रियांक शर्मा, सपना चौधरी, कलर्स आणि एनडेमॉल यांच्याविरुद्ध आईपीसीच्या काही कलमांखाली एफआयआर दाखल करणार आहे.

 


प्रियांकबरोबरच बिग बॉस ११ च्या घरातील अजून एक व्यक्ती सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे हिना खान. कधी ज्योती कुमारच्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित करणारी हिना खान काही दिवसांपूर्वी ढिंच्यॅक पूजाला सुद्धा त्रास देत होती. ज्यामुळे नंतर पूजा खूप रडली होती. आता हिनाने साऊथच्या हिरॉइन्सवर निशाणा साधला आहे.

 


त्याचं झालं असं, हिना खान 'बिग बॉस ११'च्या स्पर्धकांसोबत तिच्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे अनुभव शेअर करत होती. आणि बोलता बोलता तिने सांगितलं, की तिला साऊथच्या खूप फिल्म्ससाठी खूप ऑफर्स आल्या होत्या. पण तिला त्यासाठी वजन वाढवण्याची अट होती. त्यामुळं तिने त्या फिल्म्स नाकारल्या. ती हेही म्हणाली, 'की साऊथच्या हिरोईन या जाड असतात. तिथे साऊथ मेकर्सना नटींची साडीच्या बाहेर येणारी पोटाची चरबी पाहायला आवडते'. हिनाच्या या वक्तव्यामुळे साऊथच्या बऱ्याच हिरोइन्सने हिनाला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरवात केली.



साऊथ फिल्ममध्ये गाजलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने ही सोशल मीडियामधून हिनावर आपला राग व्यक्त केलाय. 'बहुधा टेलिव्हिजनच्या लाडक्या सुनेला हे माहीत नाही, की बॉलिवूडचे खूप कलाकार साऊथच्या सिनेमांमध्ये काम करतात. आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करताना तुला लाज वाटायला हवी', असं ट्विट हंसिकाने केलंय.



हेही वाचा

शाहरूख-गौरीच्या हॅलोविन पार्टीत तीच खाऊन गेली भाव!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा