Advertisement

प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा हसायला तयार व्हा!


प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा हसायला तयार व्हा!
SHARES

90 च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणारी एक मालिका ज्याची आजही आठवण झाली की प्रेक्षक हसल्याशिवाय राहत नाहीत. या मालिकेतील कलाकारांनी आजही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका म्हणजे श्रीमान श्रीमती. विचारात पडलात ना. नक्की काय? पण जास्त विचार करून नका. तर पुन्हा एकदा हसण्यासाठी तयार व्हा. कारण आपलं श्रीमान श्रीमती पुन्हा येत आहे. सब टीव्ही प्रेक्षकांसाठी ही मालिका पुन्हा आणत आहे.


कलाकार कोण?

सुचेता खन्ना, सुरेश मेनन, समीर शहा आणि बरखा भिस्त हे कलाकार श्रीमान श्रीमती फिरसे मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. सुरेश हा दिलरुबा, तर सुचेता आणि बरखा अनुक्रमे कोकी आणि प्रेमाचा रोल साकारतील. तर समीर केशूचा रोल करताना दिसेल.


दोन शेजाऱ्यांची धमाल मस्ती

श्रीमान श्रीमती ही मालिका शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबावर आधारित आहे. जेंव्हा दोन्ही कुटुंब एकत्र येतात तेव्हा जी धमाल घडते ती या मालिकेमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

1994 साली श्रीमान श्रीमती या मालिकेचे दूरदर्शनवरून प्रसारण केलं जात होतं. त्यावेळी जतिन कानाकीय हे केशव, राकेश बेदी हे दिलरुबाच्या भूमिकेत दिसले होते. तर रीमा लागू यांनी कोकी आणि अर्चना पुरण सिंग हिने प्रेमाची भूमिका साकारली होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा