Advertisement

ऋता दुर्गुळेचा आगळा वेगळा महिला दिन


ऋता दुर्गुळेचा आगळा वेगळा महिला दिन
SHARES

मासिक पाळीविषयी आणि त्या काळातील स्वच्छतेबद्दल मुलींना माहिती व्हावी म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री ऋता दुर्गुळेने मालाड येथील जिजामाता विद्या मंदिर येथील विद्यार्थिनींसाठी एक कार्यक्रम राबविला. ज्यामध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळीविषयी आणि सॅनिटरी नॅपकीनविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


शाळकरी मुलींशी साधला संवाद

ऋता दुर्गुळेसोबत कौन्सिलर्सने देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून अगदी सुंदर पद्धतीने मुलींना मार्गदर्शन केले. पाळी म्हणजे काय हे समजावून सांगून, नेमकं काय घडतं आणि कशा पद्धतीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे हे समजावून सांगितले. गप्पा-गोष्टींच्या स्वरुपात पाळीविषयी विद्यार्थिनींसोबत संवाद झाल्यानंतर ऋता दुर्गुळेने सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप केलं.


पॅडमॅनपासून ऋता झाली प्रेरित

नुकताच प्रदर्शित झालेल्या अभिनेता अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ने सॅनिटरी नॅपकिन्स या विषयावर भाष्य करुन हा विषय प्रेक्षकांना सुंदर पद्धतीने समजवून सांगितला. या चित्रपटामुळे अनेक जण नक्कीच प्रेरित झाले असतील. विशेष म्हणजे त्यामध्ये ऋता देखील सामील आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटाने ऋताला प्रेरित केले आणि त्यामुळे आपणही असे महत्त्वपूर्ण पाऊल उचलावे, असे ठरवून ऋताने महिला दिनाच्या निमित्ताने शाळेतल्या मुलींसोबत सॅनिटरी नॅपकिन्सविषयी संवाद साधला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा