Advertisement

बिग बाॅस : आऊ आणि शर्मिष्ठामध्ये जुंपणार !


बिग बाॅस : आऊ आणि शर्मिष्ठामध्ये जुंपणार !
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये सोमवारी नॉमिनेशन प्रक्रियेचं कार्य पार पडलं. बिग बॉसने आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क घरातील सदस्यांना दिला. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडलं. रेशम घराची कॅप्टन असल्याने या कार्यामधून व आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून तसंच नंदकिशोरने हुकुमशाहा टास्क उत्तमरीत्या केल्याने दोघेही सुरक्षित असणार आहेत.

रेशम सोमवारच्या टास्कमध्ये संचालकाच्या भूमिकेत होती. या टास्कमध्ये पुष्कर आणि मेघा सुरक्षित झाले. बाकीचे सदस्य म्हणजेच आस्ताद, सई, स्मिता, उषा नाडकर्णी आणि शर्मिष्ठा घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले.


पाच सदस्यांची क्रमवारी

मंगळवारी बिग बॉसच्या घरामध्ये दोन टास्क पाहायला मिळतील. सदस्यांना बिग बॉसच्या घरामध्ये येऊन आता ७० दिवस झाले आहेत. याच अंदाजाचा आणि कल्पकतेच्या आधारे स्वत:ची क्रमवारी सदस्यांना ठरवायची आहे. सदस्यांच्या चांगल्या कृत्याची बाहेरच्या जगात दखल घेतली गेली असेल किंवा एखाद्या कृत्याची सनसनाटी बातमी झाली असेलच. तर सदस्यांना आज आपल्यापैकी अशा पाच सदस्यांची क्रमवारी ठरवायची आहे.


मेघा अाणि रेशममध्ये वाद

मेघा आणि रेशममध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल, यावरून बरेच वाद होणार आहेत. मी देखील मागील दोन आठवड्यामध्ये चर्चा निर्माण केली असल्याने मला देखील या पहिल्या पाच क्रमांकामध्ये जागा मिळायला हवी असं नंदकिशोरचं म्हणणं असेल. तेव्हा घरातील सदस्य आता कोणत्या सदस्याला कोणत्या क्रमांकावर उभे करणार? कोणामध्ये वाद होणार? आऊ आणि शर्मिष्ठा यांच्यात जुंपलेलं भांडणही आज पाहायला मिळेल.


होऊ दे चर्चा

आपल्या जगावेगळ्या कृत्याची बातमी झाली की एका रात्रीत खऱ्या अर्थाने नशीब बदलत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. यात काहीजण खरंच काहीतरी जगावेगळं करतात.  तर काहीजण पब्लिसिटी स्टंट म्हणून असं काहीतरी वेगळं करतात जे जगासमोर येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. याच सगळ्याची ब्रेकिंग न्यूज बनते आणि सदर व्यक्ती प्रसिद्धी मिळवते.

अशाच प्रकारची जगावेगळी कृत्य करून घरातील सदस्यांना बातम्यांमध्ये यायचं आहे. त्यामुळेच मंगळवारी बिग बॉस घरातील सदस्यांना जरा हटके असं ‘होऊ दे चर्चा’ हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये रेशम कॅमेरा घेऊन, तर मेघा हातामध्ये बूम घेऊन घरामध्ये फिरताना दिसणार आहे.हेही वाचा- 

'रे राया...'च्या गीतांना जावेद, कैलाश, वैशालीसह मंगेशचा सूर !

अंशुमनची ‘चाल तुरू तुरू...’संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा