Advertisement

सिंध नरेशच्या लुकमध्ये मोहित अबरोल


सिंध नरेशच्या लुकमध्ये मोहित अबरोल
SHARES

ऐतिहासिक मालिकांचा आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग असतो. या वर्गाची आवड निवड लक्षात घेऊनच विविध वाहिन्या ऐतिहासिक मालिकांना प्राधान्य देत असतात. ‘पोरस’ ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेत आता मोहित अबरोल सिंध नरेशच्या लुकमध्ये समोर येणार आहे.


उत्सुकता वाढली 

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पोरस’ या मालिकेने आपल्या वैभवशाली इतिहासाचं अनोखं आणि कलात्मक सादरीकरण करून प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. लोकांचे आवडते व्यक्तिचित्र हस्ती ज्याने साकारले होते, तो मोहित अबरोल आता लवकरच सिंध नरेश या नवीन लुकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे मालिकेत आता काय पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.


लक्षवेधी लूक

ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. यात मोहितचा सिंध नरेश म्हणून राज्याभिषेक होणार आहे. त्याच्या आधीच्या लुकपेक्षा हा लूक खूप वेगळा आणि लक्षवेधी आहे, ज्यात प्राचीन व मौल्यवान दागदागिन्यांचा देखील समावेश आहे. मालिकेच्या या भागात खूप ऐश्वर्य आणि झगझगाटाचं दर्शन घडणार आहे, जो राजाला साजेसा असेल.


नवीन लूक  आवडेल 

आपल्या लुकबद्दल बोलताना मोहित म्हणाला की, हा लुक मला खूप आवडला आहे. हा पोशाख एक प्रकारे खूप रुबाबदार, आकर्षक आणि अस्सल देखील आहे. पडद्यावर तो नक्कीच खूप प्रभावी दिसेल. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझा हा नवीन लूक खूप आवडेल आणि या मालिकेच्या सुरुवातीपासून त्यांनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आहे तो वृद्धींगत होईल. ‘पोरस’च्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना भारतातील सर्व शक्ती एकजूट होऊन अॅलेक्झांडरच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी अखंड भारताच्या रूपात समोर आल्याचं पाहायला मिळणार आहे.



हेही वाचा -

आॅरगॅनिक गार्डनच्या प्रेमात यामी

सोनाली खरेची नाट्यभरारी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा