Advertisement

आॅरगॅनिक गार्डनच्या प्रेमात यामी

निसर्गाबाबत भरभरून बोलणाऱ्या यामी गौतमनं नेहमीच सर्वांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले खाद्यपदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. आता आपलं स्वत:चंही आॅरगॅनिक गार्डन असावं असं तिला वाटत आहे.

आॅरगॅनिक गार्डनच्या प्रेमात यामी
SHARES

यामी गौतमच्या रूपात हिंदी सिनेसृष्टीला एक गोड चेहरा लाभला आहे. अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत करियरची वाटचाल करणाऱ्या यामीच्या मनात भविष्याबाबत काही योजना आहेत. यात ग्रीनहाऊस आणि आॅरगॅनिक गार्डनचाही समावेश आहे.


निसर्गावर प्रेम 

यामी सध्या बऱ्याच सिनेमांच्या कामात बिझी आहे. नुकतंच तिने श्री नारायण सिंह यांच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. यात तिच्यासोबत शाहीद कपूर आणि श्रद्धा कपूर आहेत. या कामातून वेळ काढून निसर्गावर प्रेम करण्याचाही छंद ती जोपासते आहे.


नैसर्गिक खाद्यपदार्थासाठी प्रोत्साहन

यामी मूळची हिमाचल प्रदेशमधील बिलासपूरमधील आहे. हिरवीगार जंगलं, बर्फाच्छदित पर्वत, फुलांचे ताटव्यांनी बहरलेल्या दऱ्या आणि भरभरून वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या हिमाचल प्रदेशमधील आपल्या घराशेजारी ग्रीन हाऊस आणि आॅरगॅनिक गार्डन असावं अशी यामीची इच्छा आहे. ते साकार करण्यासाठी ती योजनाही आखत आहे. निसर्गाबाबत भरभरून बोलणाऱ्या यामीने नेहमीच सर्वांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले खाद्यपदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. आता आपलं स्वत:चंही आॅरगॅनिक गार्डन असावं असं तिला वाटत आहे.


सेंद्रीय शेतीला चालना 

ती ग्रीन हाऊसच्या बाजूला आपल्या आवडीच्या फळांची झाडं, भाज्या आणि फुलझाडं आॅरगॅनिक पद्धतीनं लावणार आहे. जेणेकरून आपलं अनुकरण करत शेजारी तसंच इतर लोकही अशा प्रकारे वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतील. सध्या तिथे वृक्ष लागवड सुरू आहे. पण ती थांबू नये आणि सेंद्रीय शेतीला चालना मिळावी, असं यामीला वाटत आहे. आपल्या या प्रयत्नांमुळे वृक्ष संवर्धन आणि लागवडीस मदत झाली तर आनंदच होईल असं ती म्हणते.



हेही वाचा - 

सोनाली खरेची नाट्यभरारी

‘दोस्तीगिरी’ सिनेमाचा ट्रेलर-संगीत अनावरण सोहळा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा