Advertisement

इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चा सोहळा यंदा व्हर्च्युअल

मागील १७ वर्षांपासून हा फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात आणि हजारो कलाप्रेमींच्या उपस्थितीत पार पडतो. यंदा कोरोनामुळे या फेस्टिव्हलचे आयोजन व्हर्च्युअली करण्यात आलं आहे.

इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चा सोहळा यंदा व्हर्च्युअल
SHARES

आशियातील सर्वात भव्य ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ १८ ते २७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे हा सोहळा यंदा व्हर्च्युअल पार पडणार आहे. www.indiaartfest.in या संकतेस्थळावर हा फेस्टिव्हल पाहता येणार आहे. यंदा फेस्टिव्हलचे १८ वे वर्ष आहे. 

दरवर्षी दिल्ली, मुंबई, बंगळुरू या ठिकाणी ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते. यामध्ये ७०० हुन अधिक कलाकार, ५० आर्ट गॅलरी आणि ६००० चित्र, शिल्प प्रत्यक्ष पहायला मिळतात. मागील १७ वर्षांपासून हा फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात आणि हजारो कलाप्रेमींच्या उपस्थितीत पार पडतो. यंदा कोरोनामुळे या फेस्टिव्हलचे आयोजन व्हर्च्युअली करण्यात आलं आहे. 

या फेस्टिव्हलमधील कलाकृतींच्या खरेदीसाठी संबंधित कलाकारांशी संकेस्थळाच्या माध्यमातून थेट संपर्क साधता येणार आहे. लोकांना अधिक सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने हा व्हर्च्युअल फेस्टिव्हल पाहता यावा या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. फेस्टिव्हलमधील कलाकृती पाहण्यासाठी नोंदणी प्रक्रिया रद्द करण्यात आली असून कमीत कमी वेळा क्लिक करणे, कलाकृती सुस्पष्ट दिसण्यासाठी झूमची सोय, कलाकृतींची माहिती, संबंधित कलाकाराच्या संपर्काची माहिती देण्यात आली आहे.

तैलरंग, अॅक्रॅलिक्स, जलरंग, लँडस्केप आदी चित्र तसेच विविध शिल्प हे सर्व २D रूम आणि ३D व्हर्च्युअल गॅलरी, ३६० डिग्रीमध्ये पाहता येणार आहे. प्रत्येक स्टॉलवर कलाप्रेमी संबंधित कलाकाराला थेट संपर्क साधू शकतात किंवा मेसेज करू शकतात. विशेष म्हणजे प्रत्येक स्टॉलवरून ते डिजिटल कॅटलॉगसुद्धा घेऊ शकतात.हेही वाचा -

पहिले लसीकरण केंद्र कूपर रुग्णालयात

समुद्र पर्यटनाची मजा वाढणार, ‘बीच शॅक’ धोरणाला मंजुरीसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा