Advertisement

...आणि युवराज सिंग 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर रडला!


...आणि युवराज सिंग 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर रडला!
SHARES

अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला रिऍलिटी शो 'कौन बनेगा कराडपती' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ तारखेच्या एपिसोडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री विद्या बालन सहभागी होणार आहे. नुकताच सोनी टीव्हीने या एपिसोडचा टीझर रिलीज केला आहे, ज्यात युवराज सिंग रडताना दिसतोय.



का रडला युवराज?

युवराज सांगतोय की, २०११ च्या वर्ल्ड कपदरम्यान माझी प्रकृती खूपच खालावली होती. एक दिवशी मी खोकल्यामुळे झोपेतून उठलो, तेव्हा खोकताना माझ्या तोडातून लाल रंगाचा म्यूकस निघाला. ऐवढंच नव्हे, तर १४ सेंटिमीटरचा ट्यूमरही माझ्या तोंडातून बाहेर आला. मात्र, अशातही मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केले. माझी प्रकृती सातत्याने खालावत होती. त्यावेळी डॉक्टरांनी मला स्पष्ट केले की, जर माझ्यावर त्वरित उपचार केले गेले नाहीत, तर मला वाचवणे अशक्य होईल. मात्र अशातही मी जिद्दीने मैदानावर उभा राहिलो. कर्करोगासारखा आजार झालेला असतानाही मी आयुष्याच्या लढाईत पराभव स्वीकारला नाही, असे सांगताना युवराजला अश्रू अनावर झाले होते.



सोमवार आणि मंगळवार या दिवशी 'कौन बनेगा करोडपती' या शो चा ग्रँड फिनाले एपिसोड पाहता येणार आहेत. 'अभिनंदन आभार' असे नाव या एपिसोड्सना देण्यात आले आहे. या कार्यक्रमात युवराजची, त्याच्या आयुष्याची लढाई ऐकताना तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसह अमिताभ बच्चनही भावूक झालेे.



हेही वाचा

रणवीर सिंहचं 'हे' खुलेआम किस झालं व्हायरल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा