Advertisement

रणवीर सिंहचं 'हे' खुलेआम किस झालं व्हायरल!


रणवीर सिंहचं 'हे' खुलेआम किस झालं व्हायरल!
SHARES

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण तो दीपिका पादुकोण किंवा 'पद्मावती' चित्रपटामुळे नाही, तर या वेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या वेळी रणवीरनं खुलेआम किस केले आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? त्यानं दीपिकाला किस केले असेल, असंच तुम्हाला वाटतंय ना? पण असं नाहीये. त्यानं ज्या व्यक्तीला किस केलं आहे, त्याला पाहून तुम्हीही चकित व्हाल!




रणवीरच्या 'किस'चा किस्सा!

रणवीर वर्कआऊट करून जीममधून बाहेर आला. नेहमीप्रमाणं त्याला त्याच्या चाहत्यांनी घेरलं. रणवीरनं त्याच्या चाहत्यांना निराश न करता त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. चाहत्यांची गर्दी पाहून तिथल्या एका कॉन्स्टेबलनं गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. रणवीरला त्या कॉन्स्टेबलचे काम एवढे आवडले की, रणवीरनं त्या कॉन्स्टेबलच्या गालावर सर्वांच्या समोर चक्क किस केलं! हा किसचा किस्सा अनेकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



रणवीरचा 'पद्मावती' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी रणवीरनं आपल्या लूकवर प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि शाहीद कपूर झळकणार आहेत.



हेही वाचा

'तारक मेहता...' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचेही झाले होते लैंगिक शोषण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा