Advertisement

एक होता 'जंगली'


एक होता 'जंगली'
SHARES

'चाहे कोई मुझे जंगली कहे, केहने दो जी कैहता रहे... याहू... याहू....' अशी आरोळी ठोकून बर्फावरून घसरगुंडी करणारा असा हा 'जंगली' अर्थात शम्मी कपूर यांचा आज जन्मदिवस. देखणा चेहरा, भरदार अंगकाठी, भुरे डोळे, कपाळावर रुळणारे केस... कपूर घराण्याला साजेसे असे शम्मी कपूर यांचे वक्तिमत्व. २१ ऑक्टोबर १९३९ साली शम्मी यांचा जन्म मुंबईत झाला. त्या काळातील सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरं अपत्य. शम्मी कपूर यांनी चित्रपटसृष्टीत अपार यश कमावलं.


सौजन्य


सुरुवातीच्या काळात १८ चित्रपट फ्लॉप

एक फ्लॉप अभिनेता ते एक प्रसिद्ध स्टार हा शम्मी कपूर यांचा प्रवास खूप धडपडीचा होता. उंच भिंतीवर जाळं विणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोळ्यासारखीच शम्मी यांची कहाणी आहे. जाळं विणण्याच्या प्रयत्नात असलेला कोळी उंच भिंतीवरून अनेकदा खाली पडतो. पण पुन्हा त्याच जिद्दीनं तो चढतो. शम्मी यांच्या बाबतीतही असच काहीसं झालं. १९५३ साली आलेल्या जीवन ज्योतीपासून ते १९५७ साली आलेल्या कॉफी हाऊसपर्यंत एकामागून एक असे १८ सिनेमे फ्लॉप झाले. पण या काळात शम्मी यांनी न डगमगता आपले प्रयत्न सुरु ठेवले.


'आय हेट माय ब्रदर' असं का म्हणाले शम्मी?

शम्मी कपूर हे कपूर घराण्यातील होते. पण हेच घराणे त्यांच्या अपयशासाठी कारणीभूत ठरत होतं. आपल्या तिन्ही मुलांनी स्वत:च्या हिमतीवर चित्रपटसृष्टीत नाव कमवावं, अशी पृथ्वीराज कपूर यांची इच्छा होती. याच कारणामुळे पृथ्वीराज कपूर यांनी शम्मी यांची कधीच कुठे शिफारस केली नाही. पृथ्वीराज कपूर यांचा मोठा मुलगा राज कपूर हे त्या दरम्यान एक नावाजलेले अभिनेते होते. राज कपूर यांनी ऐवढी उत्तुंग किर्ती कमवली होती की शम्मीनं काहीही केलं तरी तो राज यांची कॉपी करतो असाच शेरा दिला जायचा. यामुळे शम्मी इतके वैतागले होते की, एक दिवस त्यांच्या तोडूंन 'आय हेट माय ब्रदर' हेच शब्द बाहेर पडले.


सौजन्य


चित्रपटसृष्टीतला 'जंगली'

१९५७ साली 'तुमसा नही देखा' या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थानं यश मिळालं. त्यानंतर १९५९ साली आलेल्या 'दिल देके देखो' या चित्रपटामुळे शम्मी यांची एक खेळकर प्लेबॉयची प्रतिमा तयार झाली. १९६१ साली आलेल्या जंगली चित्रपटामुळे शम्मी यांची प्लेबॉय ही प्रतिमा दृढावत गेली. त्यानंतर अशाच धाटणीचे अनेक चित्रपट त्यांनी केले. यामध्ये 'दिल तेरा दिवाना', 'चायना टाऊन', 'प्रिन्स' अशा चित्रपटांचा समावेश आहे.


डान्सिंग हिरो

शम्मी कपूर यांची एक अशी खासियत जी दुसऱ्या कोणत्याच हिरोकडे नव्हती. ती खासियत म्हणजे त्यांची डान्स करण्याची अजब शैली. शम्मी यांना संगीताची उत्तम समज होती. त्यामुळे संगीताच्या तालीवर ते त्यांच्या पद्धतीत 'फ्रि स्टाईल डान्स' करायचे. गाण्याच्या शूटिंगसाठी त्यांना कधीच कोरियोग्राफरची गरज भासली नाही. शम्मी स्वत:चे स्टेप्स स्वत: बसवत. त्यांच्या याच डान्सच्या शैलीमुळे त्यांना डान्सिंग हिरो या नावानं ओळखलं जाऊ लागलं.


मोहम्मद रफी , शम्मी कपूर, अजब रसायन

शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करत. शम्मी कपूर आणि रफी हे अतिशय चांगले मित्र होते. शम्मी आपल्या यशाचं श्रेय रफी यांना द्यायला कधीच विसरत नसत.


१) गोविंदा आला रे आला



२) बार बार देखो, हजार बार देखो



३) बदन पें सितारे लपेटे हुए




४) आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर




५) ये चाँद सा रोशन चेहरा



६) लाल छडी मैदान खडी


 


७) ऐसा मौका फिर कहा मिलेगा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा