Advertisement

थुकरटवाडीत अवतरणार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू


थुकरटवाडीत अवतरणार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू
SHARES

ज्यांनी आपल्या अफाट कामगिरीने आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा गाजवली अशा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंना तुम्ही झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' च्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात पाहू शकाल. यामध्ये महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हे देखील सहभागी झाले होते. यांच्यासोबतच 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाच्या कलाकारांचीही धमाल-मस्ती तुम्हाला पाहता येईल.  

'चला हवा येऊ द्या' "हा कार्यक्रम मी नेहमी बघते आणि तो मला खूप आवडतो" असे पूनम राऊत म्हणाली तर "विश्वचषक स्पर्धा सुरू असातनाही या कार्यक्रमाची संघात चर्चा व्हायची, याबद्दल मी खूप ऐकले होते त्यामुळे यात सहभागी होण्याबद्दल उत्सुक होते" असं स्मृती मंधानाने सांगितले. या सर्व खेळाडूंनी यात सादर झालेल्या स्किटना भरभरून आणि खळखळून प्रतिसाद दिला.

येत्या 14 आणि 15 ऑगस्टला रात्री 9.30 वाजता हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा