अविष्कार मध्ये विभवांतर अव्वल


  • अविष्कार मध्ये विभवांतर अव्वल
SHARE

मुबई- इंद्रधनू निर्मित विभवांतर या एकांकीकेेनं अविष्कार खुल्या एकांकीका स्पर्धेत बाजी मारत अव्वल क्रमांक पटकावलाय. समर्थ अॅकॅडमी पुणेच्या सेकंड हँड या एकांकीकेने दुसरा तर फिनिक्स मुंबईच्या मयसभा या एकांकीकेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अस्तित्व आयोजित 30व्या अविष्कार या खुल्या एकांकीका स्पर्धेची अंतीम फेरी शनिवारी रात्री अगदी चुरशीत रंगली. यामध्ये पुणे, नाशीक, ठाणे, मुंबई अशा विविध स्तरातून 25 एकांकीकांचे सादरीकरण झाले. त्यातून अंतीम फेरीत एका हून एक सरस अशा 5 एकांकीका सादर झाल्या. त्यात मुंबईची प्रारंभ, इंद्रधनू मुंबईची विभवांतर, समर्थ अॅकॅडमी पुणेची सेकंड हँड, अंतरंग थिएटरची अस्वल, फिनिक्स मुंबईची मयसभा या एकांकीका अंतीममध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळा तीन जणांना सर्वोत्कृष्ट नायक नायिका म्हणून गौरवण्यात आलं. त्यात विभवांतर या एकांकीकेतील सर्व पात्रांना गौरवण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या