Advertisement

आजारानंतरचा इरफानचा पहिला फोटो व्हायरल


आजारानंतरचा इरफानचा पहिला फोटो व्हायरल
SHARES

अवघ्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्याला "हाय ग्रेड कँसर" झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. उपचारासाठी न्यू यॉर्कमध्ये असताना तिने केमोथेरपीदरम्यानचा "न्यू लूक" आपल्या चाहेत्यांना दाखवला. सोनालीची आजाराविरुद्ध लढण्याची जिद्द त्या फोटोमध्ये साफ दिसत होती. याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता इरफान खानने आपल्याला न्यूरोएंडोक्राइन सिंड्रोम झाला असल्याचं सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे सांगितलं होतं. यामुळे बॉलिवूड सृष्टीसोबतच त्याच्या चाहत्यांना याचा धक्का बसला होता. 

उपचारादरम्यान आपल्या तब्बेतीबद्दलही तो चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो. आता ट्विटरवर त्याने एक फोटो अपलोड करून फॅन्सला आपण ठीक असल्याचं सांगितलं आहे.


का आहे या फोटोत?

अभिनेता इरफान खान याला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन सिंड्रोम हा आजार झाला आहे. इरफान सध्या भारताबाहेर लंडनमध्ये उपचारासाठी आहे. सध्या त्याने ट्विटरवर आपला प्रोफाइल फोटो अपलोड केला आहे. त्यामध्ये त्याची तब्येत खूपच खालावली असल्याचं दिसत असलं तरी चेहऱ्यावर मात्र हास्य दिसून येत आहे.


या फोटोमध्ये इरफानने पिवळ्या रंगाचा टीशर्ट घातलं असून हेडफोन्सवर गाणे ऐकत आहे, आणि नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर स्मितहास्य! हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रेने आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या मेकओव्हर लूक ने सर्वांची मनं जिंकली तर आता इरफानने आता त्याच्या ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलून चाहत्यांना आपण ठीक असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा