• अजय-सलमानच्या मैत्रीत दुरावा
  • अजय-सलमानच्या मैत्रीत दुरावा
SHARE

मुंबई - अभिनेता अजय देवगण आणि दबंग खान सलमान यांच्या मैत्रीची चर्चा बरीच जुनी आहे. अनेकदा या दोघांनी आपली मैत्री प्रसार माध्यमांवरही जाहीर केली आहे. पण सध्या बॅटल ऑफ सारागढी सिनेमामुळे या दोघांच्या मैत्रीत दुरावा येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने या चित्रपटात अजयलाही घेण्याची मागणी निर्माता दिग्दर्शक करण जोहरकडे केली होती. तेव्हा अजयने सलमानला भावना व्यक्त करणारे एक पत्र पाठवलं होतं. बॅटल ऑफ सारागढ या ऐतिहासिक घटनेवर आधारित सिनेमा बनवण्याचं अजयने जाहीर केलं होतं. मात्र अजयला धक्का तेव्हा बसला जेव्हा सलमानने करणला बॅटल ऑफ सारागढी हा सिनेमा नुसत्या संकल्पनेवर आधारित बनवण्यास सांगितले. यामुळे अजयला खुप दु:ख झालं आणि त्याने सलमानला भावना व्यक्त करणारं पत्र पाठवलं.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पत्रातून अजयने सलमानला हा चित्रपट न बनवण्याची मागणी केली आहे. तर काही जणांचं म्हणणं आहे की, अजय सिनेमा बनवण्यापेक्षा सलमानशी हातमिळवणी करण्यावर नाराज आहे. असं सांगण्यात येतंय की, अजयच्या शिवाय या चित्रपटाच्या दरम्यान करण जोहरचा ऐ दिल है मुश्कील हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या