Advertisement

पुलकित सम्राटला जेव्हा राग येतो...


पुलकित सम्राटला जेव्हा राग येतो...
SHARES

वांद्रे - अभिनेता पुलकित सम्राट आणि एका छायाचित्रकारामध्ये झटापट झाली. पुलकित आणि त्याची पत्नी श्वेता रोहिरा घटस्फोटासाठी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात गेले होते. त्यावेळी संतोष नगरकर नामक छायाचित्रकार पुलकित आणि श्वेताचे काही फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता. संतोषने पुलकित आणि त्याच्या पत्नी श्वेताचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी पुलकित अचानक त्या छायाचित्रकाराच्या अंगावर धावून गेला.

सदर घटनेसंबंधी छायाचित्रकार संतोष नगरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. "पुलकित आणि श्वेता न्यायालयात दुपारी १ च्या सुमारास आले होते. जवळपास तीन तासांनंतर श्वेता आणि पुलकित न्यायालयातून बाहेर येताच कॅमेरा आणि प्रसारमाध्यमांची नजर चुकवून ते तेथून जात होते. पण, आम्ही त्यांचे फोटो घेण्यासाठी पुढे सरसावताच पुलकितने माझ्या अंगावर धावून येत थेट माझ्या शर्टाची कॉलर धरली. त्यावेळी पुलकितसोबत त्याचे वकील आणि त्याचे अंगरक्षक होते. त्यांनीही आम्हाला धक्काबुक्की केली," असे संतोष नगरकर म्हणाले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा