SHARE

मुंबई - आयएनटी स्पर्धांचा निकाल लागला असून यामध्ये ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजने अव्वल क्रमांक पटकावला आहे. जोशी बेडेकर कॉलेजने 'असणं नसणं' ही एकांकीका सादर केली होती. चर्चगेटमधील सिडनॅम कॉलेजने 'श्यामची आई' या एकांकीकेसाठी दुसरे स्थान पटकावले. तर उल्हासनगरमधील सीएचएम कॉलेजने 'विभांतर' एकांकीकेसाठी तिसरे स्थान पटकावले.  

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नायकाचा मान विशाल चव्हाण याला 'असणं नसणं' या एकांकीकेसाठी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट नायिका हा मान मृनाली तांबटकर हिला श्यामची आई या एकांकीकेसाठी मिळाला.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या