Advertisement

हे कलाकार घेणार घटस्फोट


हे कलाकार घेणार घटस्फोट
SHARES

कलाकारांच्या आयुष्यातलं प्रेम - लग्न - घटस्फोट, या बातम्या आपल्यासाठी काही नवं नाही. आज ज्यांचं लग्न झालंय, पुढच्या महिन्यात त्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्याही आपण आजवर ऐकल्या आहेत. आता या यादीत आणखी एका गोड कपलचंही नाव सामील होणार आहे.

जुही परमार आणि सचिन श्रॉफ ही दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांच्या प्रेमप्रकरणानंतर हे दोघे २००९ साली लग्नबंधनात अडकले होते. जुही परमार आणि सचिन श्रॉफ ही जोडी नेहमीच प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणूनच समोर आली. कुमकुम या सीरिअल नंतर जुही सर्वांचीच लाडकी झाली होती. जुही आणि सचिन यांनी 'नच बलिये ३' मध्येही भाग घेतला होता. त्यांच्या लग्नाला आता तब्बल ८ वर्षं पूर्ण झाली आहेत आणि त्यांना एक ४ वर्षांची मुलगीही आहे.  

हे दोघेही गेल्या वर्षभरापासून वेगळे रहात असल्याचंही समोर आलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार जुही लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा