Advertisement

चक्क कंगना रणौत ट्विटरला ठोकणार रामराम

ट्विटरवर तिचे चांगले फॉलोअर्स देखील आहेत. असं असलं तरी कंगना ट्विटरला रामराम ठोकणार आहे.

चक्क कंगना रणौत ट्विटरला ठोकणार रामराम
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू, बॉलिवूड नेपोटिझम, ड्रग केस, महाराष्ट्र सरकार आणि आता शेतकरी आंदोलन याबाबत ट्विटरवरून (Twitter) अभिनेत्री कंगना रणौत आपली मतं मांडत असते. ट्विटरवर तिचे चांगले फॉलोअर्स देखील आहेत. असं असलं तरी कंगना ट्विटरला रामराम ठोकणार आहे.   

कंगनानं खुद्द यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली. नाही ओ.... ट्रोलिंगमुळे ती ट्विटरला सोडून चालली नाही. तर ट्विटरला स्वदेशी पर्याय तिनं स्विकारला आहे. कंगना आता तिची मतं Koo App वर मांडणार असल्याची माहिती तिनं दिली आहे.

कंगनानं असं ट्वीट केलं आहे की, 'ट्विटर आता वेळ संपली आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकरच माझे अकाउंट डिटेल्स शेअर करेन. स्वदेशी #kooapp चा अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे.'

 कंगना याआधी अनेक वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत आली होती. मंगळवारीच तिने स्वत:ची तुलना Meryl Streep आणि Gal Gadot शी करणारं एक ट्वीट केलं होतं. ज्याची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर तिला ट्रोल देखील व्हावं लागलं होतं.



हेही वाचा

‘द फॅमिली मॅन’ वेब सिरिज प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

अभिनेते राजीव कपूर यांचं निधन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा