Advertisement

अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते.

अभिनेते राजीव कपूर यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे ते लहान भाऊ होते.

मंगळवारी राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला. रणधीर कपूर यांनी त्यांना तातडीने जवळच्या इंलॅक्स रुग्णालयात दाखल केलं. पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं. रणधीर कपूर यांनी स्वतः राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. 

राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. राजीव कपूर हे विशेषतः 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) आणि 'एक जान हैं हम' (१९८३) मधील अभिनयासाठी प्रसिध्द आहेत. राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता.

ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'प्रेमग्रंथ' सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. नितू कपूर यांनी राजीव कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं.

कपूर घराण्यातील वर्षभरातील हा दुसरा मृत्यू आहे. गतवर्षी ३० एप्रिल २०२० रोजी ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून कपूर कुटुंब सावरत असतानाच राजीव यांनी जगाचा निरोप घेतला.



हेही वाचा -

मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा