कंगनाने सैफ अली खानला फटकारले!

 Mumbai
कंगनाने सैफ अली खानला फटकारले!

घराणेशाहीवरून सैफ अली खान आणि कंगना रणौतमध्ये कोल्ड वॉर चांगलंच रंगलं आहे. आयफा अवॉर्ड सोहळ्यात करण जोहर, सैफ अली खान आणि वरूण धवन यांनी कंगनावर निशाणा साधला. त्यानंतर तिघांनी तिची जाहीर माफीही मागितली. पण हा मुद्दा इथेच संपला नाही. सैफने याप्रकरणी शुक्रवारी एक खुले पत्र लिहले. पत्रात त्याने कंगनाची माफी मागितली आणि या प्रकरणासाठी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांना जबाबदार धरले. पण अखेर कंगनाने मौन सोडले. सैफच्या पत्राला प्रत्युत्तर देत कंगनाने एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे.


पत्रात काय म्हणते कंगना...


गेल्या काही दिवसांपासून घराणेशाहीवर सकारात्मक चर्चा झाली. यातील काही मुद्दे मला पटले, तर काही मुद्द्यांमुळे माझी घोर निराशा झाली आहे. माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात सैफ अली खानने लिहलेल्या एका पत्राने झाली आहे. पण यातले काही मुद्दे मला न पटण्यासारखे आहेत. गेल्या वेळी घराणेशाहीच्या मुद्द्यावर करण जोहरने लिहलेला ब्लॉग वाचूनही मी निराश झाले होते. इतकेच नाही, तर करणने एका मुलाखतीत चित्रपट व्यवसायात यश मिळवण्यासाठी अनेक निकष लागतात. फक्त प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये यश मिळवता येत नाही, असे म्हटले होते. पण करणच्या वक्तव्याशी देखील मी सहमत नाही. एक तर करणला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे किंवा तो खूप भोळा आहे.

बिमल रॉय, सत्यजीत रे, श्री गुरु दत्त आणि अनेक प्रसिद्ध कलाकारांनी प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. या प्रतिभाशाली कलाकारांनी बॉलिवूडचा पाया मजबूत केला. मेहेनत, इच्छाशक्ती आणि प्रतिभेच्या जोरावर यश मिळवता येते हे त्यांनी सिद्ध केले आहे. या सर्वावर माझा मित्र सैफ अली खानने पत्र लिहिले आहे आणि त्यावर मी माझे मत व्यक्त केले आहे. माझ्यात आणि सैफमध्ये कुठलेच मतभेद नाहीत. आम्ही फक्त एका मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करत आहोत. माझी लोकांना विनंती आहे की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका आणि सैफ आणि माझ्यामध्ये उगाच वाद निर्माण करू नका.


सैफने त्याच्या पत्रात लिहिलं आहे की, मी कंगनाची माफी मागितली आणि यावर कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मात्र हा विषय केवळ माझ्यापुरता मर्यादित नाही. घराणेशाही हा असा एक मुद्दा आहे, ज्यामध्ये लोक बौद्धिक गोष्टींवर भर देण्यापेक्षा मानवी भावनांवर लक्ष्य केंद्रित करतात. एखादा व्यवसाय मूल्यांवर न करता भावनांच्या आधारे केला, तर तो दीर्घकाळ चालू शकणार नाही.


सैफने पत्रात आणखी एक मुद्द्यावर भाष्य केले होते. स्टार किड्सच्या आनुवंशिकतेवर सैफने केलेल्या वक्तव्याला कंगनाने उत्तर दिले आहे.


 आनुवांशिकतेचा अभ्यास करण्यात मी माझ्या जीवनाचा एक भाग व्यतित केला आहे. पण आत्तापर्यंत मला हे कळले नाही की, तुम्ही हायब्रिड शर्यतीच्या घोड्यांची तुलना कलाकारांशी कशी करू शकता? मेहनत, अनुभव, प्रेम यासारख्या गोष्टी तुम्हाला कुटुंबाच्या जीन्सच्या माध्यमातून कशा मिळतात, हे तुम्हाला सिद्ध करायचे आहे का? जर असे असेल तर, माझे बाबा शेतकरी होते. मग मलाही शेतकरी व्हायला पाहिजे होते.

कंगनाने लिहलेल्या पत्राला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यासोबत करण जोहर आणि सैफ अली खान यांच्यावर टीका केली आहे.  

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments