कपिल-करणमध्ये दुरावा

 Mumbai
कपिल-करणमध्ये दुरावा
Mumbai  -  

अंधेरी - सध्या कॉमेडीयन कपिल शर्मा मित्र वाढवण्यापेक्षा शत्रू वाढवताना दिसत आहे. नुकतेच एका कार्यक्रमात रेखाने कपिलकडे दुर्लक्ष केलं होतं. तर एका फिल्मफेअर पुरस्कारादरम्यान कपिलने दिग्दर्शक-निर्माता असलेल्या करण जोहरला आपला सहाय्यक असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. त्यामुळे करण चांगलाच नाराज झाला. असं सांगितलं जातं की करणच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये कपील शर्मा येणार होता. पण आता करणने कपिलला आपल्या शोमध्ये येण्यास नकार दिलाय. तसंच यापुढे कधीही कपिलसोबत काम करणार नसल्याचंही करणने म्हटलंय. त्यामुळे कपिलच्या शोवर याचा काय परिणाम होईल हे तर वेळच सांगेल.

Loading Comments