कपिलच्या बिल्डिंगचा होणार कॅम्पाकोला ?

 Pali Hill
कपिलच्या बिल्डिंगचा होणार कॅम्पाकोला ?
कपिलच्या बिल्डिंगचा होणार कॅम्पाकोला ?
See all

मुंबई – अवैध बांधकाम प्रकरणावरून कॉमेडी किंग कपिल शर्मा रोज नव्या अडचणीत सापडत आहे. अंधेरीतील अवैध बांधकामानंतर पालिकेने गोरेगावमधील डीएलएच इन्क्लेव्हमधील कपिलच्या नवव्या मजल्यावरील घरामध्येही अवैध बांधकाम असल्याचे समोर आणले आहे. पालिकेने एमआरटीपी अॅक्टनुसार कारवाई सुरू केल्याने आता या इमारतीचेही कॅम्पाकोला होण्याची शक्यता आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांवर लाचखोरीचा आरोप करणा-या कपिलच्या अवैध बांधकामाची कुंडली पालिकेने बाहेर काढली आहे. कपिलनेच नव्हे तर या इमारतीत राहणा-या अभिनेता इरफान खाननेही येथे अवैध बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पालिकेने या दोघांना स्वतंत्र नोटिसा बजावल्या आहेत. या अवैध बांधकामाची पाळेमुळे इतकी खोलवर गेली आहेत की, ही संपूर्ण इमारतच अवैध असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

28 एप्रिल 2016 मध्ये पालिकेने कपिलसह इरफान आणि अन्य काही रहिवाशांना या प्रकरणी नोटीस बजावल्या होत्या. इमारतीच्या मंजुर आराखड्यात बदल करण्यात आल्याने विकसकालाही नोटीस बजावण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे या इमारतीसाठी केंद्रीय पर्यावरण खात्याचीही परवानगी घेण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या इमारतीला ओसी कशी मिळाली असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. 

Loading Comments