कोण होणार 'रईस' कोण ठरणार 'काबील'?

Pali Hill
कोण होणार 'रईस' कोण ठरणार 'काबील'?
कोण होणार 'रईस' कोण ठरणार 'काबील'?
See all
मुंबई  -  

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा आगामी सिनेमा रईस आणि अभिनेता ऋतिक रोशनचा ‘काबील’ यांच्यात बॉक्स ऑफिसवर आता टक्कर होणार आहे. कारण काबील आणि रईस हे दोन्ही चित्रपट आधी 26 जानेवरीला प्रदर्शित होणार होते. त्यामुळे ‘काबील’च्या प्रदर्शनाची तारीख बदलून 25 जानेवारी करण्यात आली. पण आता शाहरुखचा रईस देखील 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

अभिनेता सलमान 'रईस' च्या बाजूने आहे. तर दुसरीकडे आमिर खानने 'काबील' ची साथ दिलीय. आमिर खानने 'काबील'च्या ट्रेलरची खूप प्रशंसाही केली. आमिरनं म्हटलं होतं की ऋतिक रोशनच्या सिनेमाचा ट्रेलर उत्सुकता आणणारा आहे. तसंच राकेश रोशन यांनी निर्मिती केलेले चित्रपट हे आपल्याला खूप आवडतात असंही आमिर म्हणाला. याशिवाय आमिरने अापल्या आगामी 'दंगल' सिनेमाशी 'काबील'चा ट्रेलर जोडण्याची परवानगीही दिली. दंगल बघण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक सिनेगृहात येतील, तेव्हा त्यांना काबीलचा नवीन ट्रेलरही पाहायला मिळेल. ज्यामुळे त्या चित्रपटालाही फायदा होईल.
सध्या या दोन्ही चित्रपटांविषयी सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे. पण बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार हे प्रदर्शनानंतरच कळेल. यापूर्वी रईस हा सिनेमा ईदच्या दरम्यान प्रदर्शित होणार होता. पण सलमानच्या सुल्तान या सिनेमाच्या प्रदर्शनामुळे रईसच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. पण आता शाहरुख़ खान ‘रईस’ होणार की ऋतिक रोशन ‘काबील’ ठरेल हे पाहणं तितकच औत्सुकतेचं राहणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.