Advertisement

'कुंकू, टिकली आणि टॅटू'..जुन्या-नव्याची सरमिसळ!


'कुंकू, टिकली आणि टॅटू'..जुन्या-नव्याची सरमिसळ!
SHARES

काळ कितीही बदलला, तरीही घर सांभाळते ती स्त्री! मुलांचं संगोपन, त्यांच्यांवर संस्कार करते ती स्त्री! नवरा, सासरची माणसं सगळ्यांना साभांळून स्वत:ची अस्मिता जपते ती स्त्री! घराला घरपण देते ती देखील स्त्रीच! तरीही मर्यादांची बंधनं घातली जातात ती स्त्रीवर. परंतु, हे चित्र आता बदलत आहे. आत्ताची स्त्री तशी राहिलेली नाही. तिला स्वत:ची मतं आहेत, विचार आहेत.

परंतु, स्त्रियांनी त्यांचे विचार मांडणे यालाच बऱ्याचदा विरोध केला जातो. विशेषत: स्त्री वर्गाचाच याला विरोध असलेला जास्त दिसून येतो. अशाच परस्परविरोधी विचारसरणीवर आधारित 'कुंकू, टिकली आणि टॅटू' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


प्रमुख भूमिका

या मालिकेमध्ये गुरुराज अवधानी विष्णुपंत कुलकर्णी ही भूमिका साकारणार असून, सारिका निलाटकर - नवाथे ही विभा कुलकर्णीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यांच्यासोबत निवोदित भाग्यश्री न्हालवे, आदिश वैद्य, श्वेता पेंडसे, अमोल बावडेकर, राजेश देशपांडे, राजश्री निकम प्रमुख भूमिकेत असतील.


काय आहे 'कुंकू, टिकली आणि टॅटू'ची कथा?

विभा कुलकर्णी हे पुण्यातलं मोठं प्रस्थ...'बाईनं बाईसारखं वागावं...आपल्या मर्यादेत रहावं' अशी त्यांची धारणा. घरातील सुनाही विभा यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यांनी आखून दिलेल्या चौकटीतच सर्व जगत आहेत. हे घर अत्यंत पारंपरिक पण प्रसंगी कर्मठ आहे. वडील, भाऊ, नवरा यांना समाधानात आणि सुखात ठेवण्याची जबाबदारी घरच्या स्त्रीवर आहे.

अशा घरामध्ये रमासारखी बिनधास्त, आताच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी सून म्हणून येते. रमाला बास्केटबॉल खेळायला आवडतं. विभक्त कुटुंबातून आल्यामुळे रमाच्या मनामध्ये समस्त पुरुष जातीबद्दल आणि कुटुंब व्यवस्थेबद्दल नाराजी आहे. तिची स्त्री स्वातंत्र्याबद्दल ठाम मतं आहेत. आणि जेव्हा विभा आणि रमा या परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या स्त्रिया एकमेकांसमोर येतील, तेव्हा घराचं घरपण, कौटुंबिक जिव्हाळा, एकमेकांबद्दलचं प्रेम या दोघी कशा टिकवून ठेवतील? रमा आणि विभा कसा समतोल साधतील? कुलकर्णी परिवार आणि विभा रमाला स्वीकारू शकतील का? हे बघणं नक्कीच रंजक असणार आहे!



हेही वाचा

राधिकाचा हा मेकओव्हर तुम्ही बघितला का?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा