'लाली की शादी…'चे पोस्टर प्रदर्शित


'लाली की शादी…'चे पोस्टर प्रदर्शित
SHARES

मुंबई - 'लाली की शादी में लड्डू दीवाना' या चित्रपटाचं पोस्टर सोमवारी प्रकाशित करण्यात आलं. अभिनेता कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसन आणि अभिनेता नसिरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह या दोघांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अक्षराची यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'शमिताभ'मधील भूमिका प्रेक्षकांनी नाकारली होती. तर विवानच्या 'हॅपी न्यू इयर'लाही बॉक्स ऑफिसवर जेमतेम यश मिळालं होतं. त्यामुळेच येत्या 7 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे अपेक्षा खूप वाढल्या आहेत.

संबंधित विषय