SHARE

मुंबई - जबरदस्त फॅनफाॅलोइंग असलेला ललित प्रभाकर लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून 'आदित्य' या नावाने ललित घराघरात पोहोचला.
त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. नेहा महाजन या गुणी अभिनेत्रीनेसुद्धा विविध भूमिकेतून, वेगवेगळ्या भाषेचे सिनेमे करून आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
वैशाली एंटरटेन्मेंट या बॅनरखाली निर्मित 'टी टी एम एम' या सिनेमात या दोघांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. कुलदीप जाधव या नव्या दमाच्या दिग्दर्शकानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. तर तेजपाल वाघ यांनी सिनेमाची कथा, पटकथा तसंच संवाद लिहिलंय. पंकज पडघन या सुप्रसिद्ध संगीतकारांने सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. मयुर हरदास यांनी सिनेमॅटोग्राफी, संकलन तसंच क्रिएटीव्ह प्रोड्युसरची जबाबदारी सांभाळली आहे.
या सिनेमाची कथा आपल्या आयुष्यात वेगळ्या छटाही असतात याचा अनुभव हा सिनेमा देईल हे नक्कीच.

संबंधित विषय
ताज्या बातम्या