Advertisement

माधुरी-रेणुका 24 वर्षानंतर 'या' गाण्यावर थिरकल्या


माधुरी-रेणुका 24 वर्षानंतर 'या' गाण्यावर थिरकल्या
SHARES

'हम आप के है कौन' या चित्रपटात दोन बहिणींची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे या जोडीने केलेल्या एका डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते गाणं कोणतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण ते गाणं आहे 'लो चली मै'


आणि धरला ठेका

खरंतर 'बकेट लिस्ट'च्या सेटवर' शुटिंग सुरू असताना एकाने त्यांचा 24 वर्षांपूर्वी गाजलेला चित्रपट 'हम आप के है कौन' या चित्रपटातील 'लो चली मै' हे गाण वाजवलं. त्या क्षणी या दोघींनी एकमेकांकडे पाहिलं आणि गाण्यावर ठेका धरला.

 

करण जौहरने केलं ट्वीट

हा व्हिडिओ पाहून 'चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं' ट्वीट करण जौहरने केलं आहे. 

 माधुरीनेही तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत 'काही बंध कधीच जुने होत नाहीत, असं कॅप्शन दिलं आहे करण जौहरचा 'बकेट लिस्ट' मधून धक धक गर्ल माधुरी दीक्षित पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात रेणुका शहाणेसुद्धा झळकरणार आहे. ‘बकेट लिस्ट’ हा सिनेमा येत्या 25 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा