Advertisement

आदिपुरुष चित्रपटाचा सेट जळून खाक, प्रभास, सैफ अली खान घटनास्थळी होते हजर

मंगळवारी मुंबईतील गोरेगाव भागातील एका स्टुडिओच्या भागाला भीषण आग लागली.

आदिपुरुष चित्रपटाचा सेट जळून खाक, प्रभास, सैफ अली खान घटनास्थळी होते हजर
SHARES

मंगळवारी मुंबईतील गोरेगाव भागातील एका स्टुडिओच्या भागाला भीषण आग लागली. इथंच आगामी 'आदिपुरुष' या मेगा बजेट चित्रपटाचा सेट बनवण्यात आला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभाष आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली.

सेटवर उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ''संपूर्ण सेट लाकूड आणि ताडपत्रीनं तयार करण्यात आला होता. आगीची घटना घडली तेव्हा आदिपुरुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे प्रभास आणि सैफ अली खान घटनास्थळी हजर होते. जवळपास ४०० जण यावेळी इथं उपस्थित होते. सुदैवानं जीवीतहानी झाली नाही.''

प्रत्यक्षदर्शीनं पुढे सांगितल्यानुसार, दुपारी सवा चार वाजताच्या सुमारास ही आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला जवळजवळ दोन तासांचा कालावधी लागला. या आगीमुळे आदिपुरुषच्या निर्मात्यांचे मोठे नुकसान झाल्याचं समजतं. सेटवर लावण्यात आलेला ग्रीन क्रोमा जळून खाक झाला आहे.

आदिपुरुष या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मंगळवारीच मुंबईत सुरुवात झाली होती. अभिनेता प्रभासनं स्वतः सोशल मीडियावर चित्रीकरण सुरू झाल्याचं जाहीर केलं होतं. प्रभासनं चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर करत 'आदिपुरुष आरंभ' असं कॅप्शन दिलं होतं.

यापूर्वी मंगळवारी पहाटे मुंबईच्या अंधेरी परिसरातील एका सहा मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली होती. अग्निशमन विभागाच्या अधिका-याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, अंधेरी येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी प्लाझा इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या आगीत कोणीही जखमी झाले नाही.



हेही वाचा

ज्येष्ठ गायक पं. राजा काळे यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२१ जाहीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा