Advertisement

ज्येष्ठ गायक पं. राजा काळे यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२१ जाहीर

आजवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या सुमधूर आवाजाच्या माध्यमातून सूरांची सेवा करणारे ज्येष्ठ गायक पं. राजा काळे यांना यंदाचा पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ज्येष्ठ गायक पं. राजा काळे यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२१ जाहीर
SHARES

आजवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या सुमधूर आवाजाच्या माध्यमातून सूरांची सेवा करणारे ज्येष्ठ गायक पं. राजा काळे यांना यंदाचा पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सभा मुलुंड या संस्थेनं मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं ७  फेब्रुवारीला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित केला आहे. या समारोहामध्ये पं. राजा काळे यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२१ या महोत्सवानं सन्मानित करण्यात येणार आहे. 

दरवर्षी जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्ट यांच्या सहकार्यानं हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. २०२१-२२ हे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यंदाच्या महोत्सवात ज्येष्ठ गायक पं. राजा काळे यांच्यासह गिटारवादक अभिषेक प्रभू, तबलावादक मंदार पुराणिक, विघ्नेश कामत, हार्मोनियमवादक अनंत जोशी, पखवाजवादक हनुमंत रावडे, मंजिरावादक अनिल पै, तानपुरा आणि गायक सहायक श्याम जोशी आणि अमृता काळे यांचा सहभाग आहे. श्रुती रानडे कार्यक्रमाचं सूत्रसंचालक करणार आहेत. ७ फेब्रुवारीला सायंकाळी ५:३०  वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीनं कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण संध्याकाळी ५:३० ते ८:३०  या वेळेत होणार असल्यानं संगीतप्रेमींना घरबसल्या दर्जेदार संगीताचा आस्वाद घेता येणार असून www.gsbsabhamulund.com आणि https://www.youtube.com/channel/UC2Kx7GQxzsmm_9TUV0kVc_Q या लिंकवर कार्यक्रम पाहता येईल, असं संस्थेचे सरचिटणीस गणेश राव यांनी सांगितलं आहे.

(veteran vocalist raja kale gets pt bhimsen joshi memorial award)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा