Advertisement

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथला पुत्ररत्न

कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथला पुत्ररत्न
SHARES

कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी यांना मुलगा झाला आहे. १ फेब्रुवारी रोजी पहाटे गिन्नी चतरथनं मुलाला जन्म दिला. कपिल शर्मानं सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कपिलनं गिन्नी आणि त्यांचे बाळ दोघेही सुखरुप असल्याचं सांगितलं आहे. कपिल शर्माला याआधी एक मुलगीआहे. तिचं नाव अनायरा आहे. २०१९ मध्ये अनायराचा जन्म झाला.

कपिल शर्मानं पहाटे ५.३० वाजता एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, “नमस्कार, आज सकाळी आमच्या घरी मुलानं जन्म घेतला आहे. ईश्वराच्या कृपेनं बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल.”

काही दिवसांपूर्वी स्वत: कपिलनं सोशल मीडियावर त्याची पत्नी गिन्नी दुस-यांदा गरोदर असल्याची पुष्टी केली होती. सोशल मीडियावर एका नेटक-यानं 'द कपिल शर्मा शो' का बंद होतोय, असा प्रश्न कपिलला विचारला होता. त्यावर “मला माझ्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पत्नीसोबत घरी काही वेळ घालवायचा आहे”, असं उत्तर कपिलनं दिलं होतं.



हेही वाचा

‘द कपिल शर्मा शो’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मात्र...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा