Advertisement

‘द कपिल शर्मा शो’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मात्र...

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘द कपिल शर्मा शो’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मात्र...
SHARES

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र कपिलच्या चाहत्यांनी निराश व्हायची गरज नाहीय. कारण वृत्तानुसार, हा कॉमेडी शो नवीन सीझनसह छोट्या पडद्यावर लवकरच परतणार आहे. मात्र यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या शोचे चित्रीकरण मध्यंतरी थांबलं होतं. जुलै २०२० मध्ये पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात झाली. मात्र तेव्हा स्टुडिओत प्रेक्षक नव्हते. लाइव्ह प्रेक्षकांऐवजी कटआउट्स ठेऊन शूटिंग केलं जात होतं. हा शो सध्या वीकेंडला टेलीकास्ट होतोय.

ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टुडिओत प्रेक्षक नसतात. सध्या मोठ्या प्रमाणात चित्रपटदेखील रिलीज होत नाहीयेत. त्यामुळे बॉलिवूड कलाकारही पुर्वीसारखे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोवर येत नाहीयेत.

त्यामुळे निर्मात्यांनी सध्या शोसाठी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा सर्व गोष्टी सामान्य होतील, तेव्हा शो देखील नव्या रुपात परत येईल. दरम्यान, कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.हेही वाचा

सप्तसूर म्युझिकवर "करवली" गाणं लाँच

‘कानभट्ट’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा