Advertisement

‘कानभट्ट’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

झी म्युझिक मराठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निर्मात्यांनी “कानभट्ट” चा ट्रेलर रिलीज केला.

‘कानभट्ट’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलिज
SHARES

प्रेक्षकांच्या  मनाला भिडणारं कथानक,  हेच मराठी चित्रपटाच्या यशाच्या गमक आहे,  हे वेळोवेळी सिद्ध  झालेलं आहे....  आतापर्यंत यशस्वी झालेल्या अनेक चित्रपटांच्या आशयानेच, त्या त्या चित्रपटात एकप्रकारे नायकाची भूमिका साकारली आहे. असाच एक नवीन आशयसंपन्न मराठी चित्रपट ‘कानभट्ट’ रिलीज साठी सज्ज आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्या अपर्णा. एस. होशिंग आणि अभिनेता भव्य शिंदे  “कानभट्ट” द्वारे, प्रेक्षकांना नवीन वर्षाची भेटवस्तू देण्यास उत्सुक आहेत. हा पीरियड ड्रामा १९ फेब्रुवारी २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पडद्यावर येईल.

झी म्युझिक मराठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निर्मात्यांनी “कानभट्ट” चा ट्रेलर रिलीज केला. ट्रेलरच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येतात. एका लहान मुलाच्या (ऋग्वेद मुळे) स्वप्नांबद्दल आणि इच्छेबद्दलच्या ह्या प्रवासात, त्या मुलाला वडीलधाऱ्यांच्या शब्दांचं पालन करण्यास भाग पाडलं जातं. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं, ज्यामुळे नायक एका अनोख्या वाटेवर जाताना आपणास दिसतो. एकूणच कथेत वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविले गेले आहेत.

हेही वाचा- 'कानभट्ट' चित्रपटाच्या मोशन पोस्टरचं अनावरण

याबद्दल अपर्णा होशिंग म्हणाल्या, “मी दिग्दर्शन करण्यासाठी माझा पहिला चित्रपट म्हणून मराठी भाषेतील चित्रपटाला निवडले, कारण आशययुक्त कथानक आणि अभिनय यामुळे, आता मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे. मी नेहमीच कथानकाला आणि विषयाला प्राधान्य देते. आता मी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचा ट्रेलर आउट झाला आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.”

अपर्णा होशिंग यांनी दिग्दर्शित केलेला ‘कानभट्ट’हा चित्रपट रॅश प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार केला असून, अपर्णा होशिंग ह्याच निर्मात्या देखील आहेत. (trailer release of marathi movie kaanbhatt)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा