Advertisement

मंगेश बनला पीएचडी शिक्षक


मंगेश बनला पीएचडी शिक्षक
SHARES

नेहमीच आव्हानात्मक भूमिकांच्या शोधात असलेला अभिनेता मंगेश देसाईनं 'लाल बत्ती' या चित्रपटासाठी पोलिसांचं ट्रेनिंग घेतल्याची एक्सक्लुझीव्ह बातमी तुम्ही वाचली असेलच. मंगेशची आणखी एक बातमी नुकतीच आली आहेछोट्या पडद्यावर मंगेश एका पीएचडी शिक्षकाची भूमिका साकारत आहे.

'झी युवा' वाहिनीवरील 'कट्टी बट्टी' या मालिकेत मंगेशही दिसणार आहेअहमदनगरमध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' या मालिकेत पाहायला मिळत आहेयात पुष्कर सरद हा परागची, तर अश्विनी कासार ही पूर्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत पराग आणि पूर्वाचं लग्न मोडल्याचं आपण पाहिलंआता पूर्वा आपलं शिक्षण पूर्ण करण्यावर फोकस करणार आहे.

आयुष्यात पूर्वा जेव्हा गोंधळून जातेतेव्हा पीएचडीसाठी गाईड करणाऱ्या पाठारेसरांची भेट घेतेया पाठारे सरांची भूमिका मंगेश साकारत आहे. हे नगरमधील एक हुषार आणि बुध्दिमान व्यक्तिमत्त्व आहेशिस्तप्रियवेळेला महत्त्व देणाऱ्या आणि शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या पाठारे सरांचं मार्गदर्शन पूर्वासाठी नेहमीच मोलाचं ठरलं आहेपीएचडीसोबतच आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना कसा करायचा हे देखील पाठारेसर पूर्वाला शिकवत असतातहेही वाचा

मंगेश देसाईनं घेतलं पोलिसांचं ट्रेनिंग!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा