Advertisement

मुक्ताच्या 'त्या' व्हिडिओमुळे सोशल मिडियावर खळबळ!


मुक्ताच्या 'त्या' व्हिडिओमुळे सोशल मिडियावर खळबळ!
SHARES

'एक तर मी तुरुंगात आहे, मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय...पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं...मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं...'या आशयाचा एक व्हिडीओ नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने तिच्या फेसबुक पेज वर अपलोड केला आणि एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमध्ये मुक्ता अतिशय घाबरलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर घाम आणि कपाळावर रक्त दिसतंय. हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर सुद्धा व्हायरल झालाय. मुक्ताच्या फेसबुक पेजवर अंदाजे १.२५ लाख फॉलोअर्स आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, तर फेसबुकवर तो १००हून अधिक वेळा शेअर झालाय. व्हॉट्सअॅपच्या शेअर्सची तर गिनतीसुद्धा नाही!  मुक्ताच्या त्या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.हा व्हिडीओ नक्की असा का शेअर करण्यात आला आहे?  हे मात्र अजूनही समजलेले नाही. सध्याच्या ऑनलाइन जगात मुक्ताच्या या विचित्र व्हिडिओची चर्चा मात्र तुफान सुरू आहे. मुक्ता नेमकी इतकी कुणाला आणि कशासाठी घाबरली आहे? आणि त्यामागे कोणतं सत्य लपलं आहे? हा लोकांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे. काहीजण मुक्ताला काळजी घ्यायला सांगत आहेत, तर काहींच्या मते हे नवीन सिनेमा, मालिका किंवा एखाद्या नवीन नाटकाचं प्रमोशन आहे. नक्की काय आहे हे पाहण्यासाठी मात्र मुक्ताच्या पुढील व्हिडिओची किंवा मुक्ताच्या ऑफिशिअल स्टेटमेंटची वाट पाहूया.
हेही वाचा

मराठी सिनेमांमधील गाजलेले लिपलॉक!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा