Advertisement

हे आहेत मराठी सिनेमांमधील गाजलेले लिपलॉक


हे आहेत मराठी सिनेमांमधील गाजलेले लिपलॉक
SHARES

गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमांनी एक वेगळी वाट धरली असून अनेक दर्जेदार विषयांवर सिनेमे तयार होऊ लागले आहेत. हिंदी सिनेमांमध्ये तुम्ही नेहमीच किसींग सीन बघत असाल. पण मराठी सिनेमांमध्ये किसींग सीन फारच कमी बघायला मिळतात. खरंतर आतापर्यंत कोणत्याही मराठी सिनेमात मुद्दामहून किसींग सीन टाकलेला दिसत नाही. फार कमी सिनेमांमध्ये किसींग सीन असून कथेची गरज लक्षात घेऊन हे किसींग सीन त्यात आले असल्याचे जाणवते. हे सीन दाखवताना कुठेही व्हल्गॅरिटी येऊ दिली नाहीये. आतापर्यंत कोणकोणत्या मराठी सिनेमांमध्ये लिप टू लिप किसींग सीन दाखवण्यात आले आणि ते तितकेच गाजलेही. असे सीन कोणते ते पाहुयात :

जोगवा :

राजीव पाटील दिग्दर्शित हा सिनेमा २००९ ला प्रदर्शित  झाला. मुक्त बर्वे आणि उपेंद्र लिमये ह्याची जोडी आपल्याला ह्या सिनेमात पाहायला मिळाली. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला ह्याची बरीच कारण आहेत . ह्या सिनेमाने एका वेगळ्याच विषयाला हात घातला होता.‘जोगवा’ सिनेमात त्यांनी लिप टू लिप किसिंग सीन दिलेला आहे. ‘जीव रंगला’ या अजय-अतुल यांनी संगीत दिलेल्या सुमधूर गीतात हा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनची चांगलीच चर्चा झाली होती.

पुणे ५२ :

मराठीतील सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्यावरही ‘पुणे ५२’ या सिनेमात एक किसींग सीन शूट करण्यात आला असून या सीननेही चांगलीच धमाल उडाली होती. ‘पुणे ५२’ हा सिनेमा जरी प्रेक्षकांच्या फार लक्षात नसला तरी, यातील हा सीन मात्र सर्वांनाच आठवत असेल.

 दुभंग :

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर या रिअल लाईफ जोडीचा ‘दुभंग’ नावाचा सिनेमा आला होता. या सिनेमात या दोघांचा एक किसींग सीन दाखवण्यात आला आहे.

टाइमप्लीज :

उमेश कामत आणि प्रिया बापट या सुद्धा रिअल लाईफ कपलचा एक किसींग सीन गाजला आहे. ‘टाइम प्लीज’ या सिनेमात या दोघांचा हा सीन असून या सिनेमाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली होती.


मितवा :


सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या ‘मितवा’तील किसींग सीनची चांगलीच चर्चा झाली होती. या दोघांनी एक अफालतून किसींग सीन दिला होता.

शॉर्टकट :

वैभव तत्ववादी आणि संस्कृती बालगुडे हि जोडी या सिनेमात पाहायला मिळाली. सिनेमात या दोघांचा किसिंग सीन आहे. हा सिनेमा खूप चालला नाही पण या दोघांच्या किसिंग सीनची चर्चा सिनेमापेक्षा ही जास्त झाली.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा