Advertisement

'आम्ही दोघी'मधले प्रिया बापट आणि मुक्ता बर्वेचे स्पेशल रोल!


'आम्ही दोघी'मधले प्रिया बापट आणि मुक्ता बर्वेचे स्पेशल रोल!
SHARES

चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटआम्ही दोघी’ या आगामी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेमध्ये एकत्र येत आहेत. अभिनेत्री, कॉस्चुम डिझायनर आणि सह-दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या प्रतिमा जोशी पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून या सिनेमाच्या निमित्ताने समोर येत आहे. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे या दोघींना एकत्र काम करताना पाहणे ही रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे.

'आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप-मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टीकोनही ध्यानात घेतला पाहिजे, ही बाब या चित्रपटात अधोरेखित होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल व त्यांच्या संवेदनशीलतेला स्पर्श करून काही गोष्टींचा विचार करायला भाग पाडेल,” असे दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले.



प्रतिमा जोशी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तब्बल 10 चित्रपटांमध्ये सह-दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पारी पाडली आहे. या चित्रपटांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'आजचा दिवस माझा' या चित्रपटांचा समावेश आहे. ‘आम्ही दोघी’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद भाग्यश्री जाधव यांनी लिहिले आहेत. ‘आम्ही दोघी’ चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

बॉलिवूड अभिनेत्री असिन बनली आई!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा