Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री असिन बनली आई!


बॉलिवूड अभिनेत्री असिन बनली आई!
SHARES

बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री असिन हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. असिनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो देखील शेअर केला आहे. तिने तिचा पती राहुल शर्मासोबतचा हा फोटो शेअर केला आहे.


इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करत असिनने पुढे लिहले आहे की, 'मला मुलगी झाल्याची ही गोड बातमी देताना खूप आनंद होत आहे. शुभेच्छा दिल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देते, हे माझ्यासाठी बेस्ट बर्थ डे गिफ्ट आहे.


असीन लग्नानंतर झाली गायब

असिनने मायक्रोमॅक्सचा फाऊंडर राहुल शर्मा याच्यासोबत 2016 मध्ये लग्न केले होते. अनेक चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री असिन लग्नानंतर मात्र गायब झाली. 2015 मध्ये आलेला ऑल इज वेल हा तिच्या लग्नापूर्वीचा शेवटचा सिनेमा आहे. मात्र त्यानंतर तिने अभिनयाकडे पाठ फिरवली. 


कशी घडली असिन आणि राहुलची भेट?

असे म्हटले जाते की, अभिनेता अक्षय कुमारनेच असिन आणि राहुल शर्मा यांची भेट घडवून दिली होती. 'खिलाडी 786' या सिनेमात अक्षय कुमारसोबत असिन ही मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी मायक्रोमॅक्स मोबाईलचे संस्थापक राहुल शर्मा यांच्या मायक्रोमॅक्स या मोबाईलला मान्यता मिळाली होती. त्याचवेळी असिन आणि राहुल यांची भेट झाली होती. ज्यानंतर ते दोघेही लग्नबंधनात अडकले. 

अक्षय कुमारने देखील असिनला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा