Advertisement

स्पृहा जोशी बनली सूत्रसंचालिका!


स्पृहा जोशी बनली सूत्रसंचालिका!
SHARES

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर’ हा कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अाता स्पृहा जोशी उचलणार अाहे. आजवर तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी स्पृहा जोशी या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. ६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या गायनाच्या कार्यक्रमात ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या पर्वात आपलं टॅलेंट दाखविणार आहेत.


अाॅडिशन्स संपन्न

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नुकत्याच या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स पार पडल्या. या छोट्या सूरवीरांचं सुरेल गाणं ऐकायला संपूर्ण महराष्ट्र आतूर आहे. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे हे या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभले आहेत.


संगीत मला मनापासून आवडतं. याशिवाय लहान मुलांमध्ये मी रमते. 'सूर नवा ध्यास नवा'च्या या पर्वामध्ये या दोन्हींचा संगम घडला आहे. लहान मुलांना गृहित धरून चालत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीचं नीट लॉजिक द्यावं लागतं. ती थेट बोलतात. एखादी गोष्ट आवडली किंवा नाही, हे कुठलाही आडपडदा न ठेवता सरळ सांगतात. त्यामुळे तुम्ही जसे आहात, तसेच खरेखुरे त्यांच्यासमोर गेलात तरच त्यांच्याशी मैत्री करू शकता. ही बच्चेकंपनी आणि प्रेक्षक, परीक्षक यांच्यातला मी दुवा असणार आहे. त्यामुळे मी खूश आहे.
- स्पृहा जोशी, अभिनेत्री


हेही वाचा -

मांजरेकरांच्या सिनेमात सोनल चौहान

शाहरुख-रितेशच्या लढतीला अजय-अतुलचा बँडबाजा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा