अशी झाली 'जय मल्हार' ची शेवटची पार्टी!

    मुंबई  -  

    काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला 'जय मल्हार' ही मालिका संपणार असल्याची बातमी दिली होती. नुकताच  ह्या मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्यात आला. लवकरच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. ह्या मालिकेची सक्सेस आणि एन्ड पार्टी नुकतीच वरळीतल्या सनवीला बँक्वेटमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडली. ह्या वेळी मालिकेची संपूर्ण टीम अगदी निर्मात्यांपासून स्पॉट बॉयपर्यंत सगळ्यांनीच हजेरी लावली. ही मालिका संपणार ह्याचं दुःख जेवढं प्रेक्षकांना होतंय अगदी तेवढंच दुःख मालिकेतील स्टारकास्ट म्हणजेच खंडेराया, म्हाळसा आणि बानूला पण होतंय. मालिका जरी संपत असली तरीही खंडेराया, म्हाळसा आणि बानू प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहतील हे नक्की.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.