एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये 'दशक्रिया'ची निवड!


  • एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये 'दशक्रिया'ची निवड!
  • एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये 'दशक्रिया'ची निवड!
SHARE

राष्ट्रीय पारितोषिक विजेता 'दशक्रिया' चित्रपटाची गोवा राज्यात होणाऱ्या एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने निवडण्यात आलेल्या सहा मराठी चित्रपटांमध्ये निवड झाली असून 'दशक्रिया'च्या सन्मानात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. एनफडीसीचा 'फिल्म बाजार' येत्या २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार आहे. 'दशक्रिया' हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'दशक्रिया' चित्रपटाला ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपट(निर्मिती - दिग्दर्शन), सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अशा चार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयाची निवड करून पदार्पणातच दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिग्दर्शक संदीप पाटील चार राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे.सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातल्या वास्तवतेच्या मुळाशी जाऊन त्यातील मर्म जाणणारे प्रतिभावंन्त लेखक - गीतकार - कवी म्हणून संजय कृष्णाजी पाटील यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. बाबा भांड यांच्या प्रचंड गाजलेल्या 'दशक्रिया' या कादंबरीवर सूक्ष्म निरीक्षणासोबतच अभ्यासपूर्ण लिहिलेल्या पटकथेमुळे त्यांना 'दशक्रिया' चित्रपटाने पहिला ‘सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेचा’ राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन त्यांच्या प्रतिभेचा यथोचित सन्मान केला आहे. या चित्रपटासाठी ५१ वर्षांनंतर पहिल्यांदाच अभिनेते मनोज जोशी यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या