• टीव्ही अभिनेत्रीचा हरवलेला पती शिर्डीत सापडला!
SHARE

गोरेगाव (पू.) मध्ये राहणाऱ्या टीव्ही अभिनेत्रीचा पती तीन दिवसांपूर्वी अचानक गायब झाला होता. अभिनेत्रीच्या भावाने तीन दिवसांपूर्वी याची तक्रार बांगुरनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मिळालेल्या माहितीनुसार तो आता पुन्हा घरी परतला आहे.

बांगुरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी चिरागचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर कोणालाही काहीच न सांगता तो सरळ शिर्डीला निघून गेला होता. ज्यानंतर  चिराग चौहानच्या भावाने पोलिसात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

चिरागची पत्नी संगीता ही कलर्स चॅनलवरील निर्माते सुरज बडजात्या यांच्या 'एक श्रृंगार स्वाभिमान’ या मालिकेत अभिनय करते. संगीता नेहमी आपल्या कामात व्यस्त असल्याने ती आपल्या पतीला वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. मात्र मागच्या आठवड्यात गुरुवारी त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर मोबाईल बंद करत तो घरातून निघून गेला होता. चिराग आणि संगीता या दोघांचा आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. चिराग 'देख इंडिया सर्कस' या चित्रपटाचा निर्माता आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.     

संबंधित विषय
ताज्या बातम्या