पुन्हा जुळले मृण्मयी-राहुलचे सूर

अभिनेता अंबरिश दरक दिग्दर्शित 'अनुराग' या मराठी चित्रपटाद्वारे सिनेनिर्मितीकडे वळलेल्या मृण्मयीनंच या निनावी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृण्मयीचा नवा लूक व्हायरल होत होता. हा तिचा लूक कशासाठी याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच तिचा हा लूक या चित्रपटासाठी असल्याचं समजतं.

SHARE

काही कलाकारांनी बऱ्याचदा जोड्यांच्या रूपात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यामुळंच एखादी गाजलेली जोडी जेव्हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येते, तेव्हा तिच्याकडून अपेक्षा वाढतात. अशीच एक अपेक्षा वाढवणारी मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे या जोडीचे पुन्हा सूर जुळल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


मृण्मयी ट्रॅव्हलरच्या भूमिकेत

मृण्मयी आणि राहुल यांनी सर्वप्रथम नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या '१५ ऑगस्ट' या मराठी चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. या चित्रपटाच्या यशानंतर ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटात एकत्र आली आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित झालेलं नसल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात मृण्मयी एका 'ट्रॅव्हलर'च्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती मात्र सूत्रांकडून मिळाली आहे. या चित्रपटाचं शीर्षक आणि इतर कलाकार-तंत्रज्ञांबाबतची माहिती लवकरच रिव्हील करण्यात येणार असल्याचं समजतं.


मृण्मयीचं दिग्दर्शन

अभिनेता अंबरिश दरक दिग्दर्शित 'अनुराग' या मराठी चित्रपटाद्वारे सिनेनिर्मितीकडे वळलेल्या मृण्मयीनंच या निनावी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृण्मयीचा नवा लूक व्हायरल होत होता. हा तिचा लूक कशासाठी याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच तिचा हा लूक या चित्रपटासाठी असल्याचं समजतं. मृण्मयी आणि राहुलला दुसऱ्यांदा एकत्र पाहायला मिळणार असल्यानं त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राहुलच्या चित्रपटातील भूमिकेबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात येत आहे. 


तोलामोलाची जोडी 

राहुलनं यापूर्वी बऱ्याच हिंदी, मराठी मालिकांमधून काम केलं आहे. याखेरीज 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हेंटिलेटर', 'वक्रतुंड महाकाय', 'मुंबई मेरी जान' या गाजलेल्या मराठी, हिंदी चित्रपटांमध्येही त्यानं वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय राहुलनं वेबसिरीजमध्येही आपलं अभिनय कौशल्य दाखवत स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळेच मृण्मयी आणि राहुल ही तोलामोलाची जोडी पुन्हा एकदा कशा प्रकारे प्रेक्षकांना भुरळ घालते ते पाहायचं आहे.हेही वाचा -

मोहन जोशी शिकताहेत ६६वी कला!

'स्टेपनी' घेऊन आला भरत
संबंधित विषय
ताज्या बातम्या