Advertisement

मोहन जोशी शिकताहेत ६६वी कला!

मोहन जोशींची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या '६६ सदाशिव' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिव्हील करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये मोहन जोशींचा चष्म्यातून डोळे विस्फारलेला अर्धवट चेहरा पाहायला मिळतो. अर्धवट अशासाठी कारण त्यांनी आपल्या मुखाजवळ एक पुस्तक धरलं आहे.

मोहन जोशी शिकताहेत ६६वी कला!
SHARES

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी नेहमीच विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ते एकीकडं रंगभूमीवर 'नटसम्राट' बनल्याचे दिसले, तर दुसरीकडे रुपेरी पडद्यावर 'पुष्पक विमान'मध्ये वारकरी तात्याच्या रूपात झळकले. हेच जोशी आता ६६वी कला शिकत असून, यासाठी त्यांनी एक नवं रूप धारण केल्याचं पाहायला मिळणार आहे.


कला नेमकी कोणती?

मोहन जोशींची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या '६६ सदाशिव' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिव्हील करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये मोहन जोशींचा चष्म्यातून डोळे विस्फारलेला अर्धवट चेहरा पाहायला मिळतो. अर्धवट अशासाठी कारण त्यांनी आपल्या मुखाजवळ एक पुस्तक धरलं आहे. यावर '६६व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम!' असं लिहिलं आहे. यावरून जोशी या चित्रपटात ६६वी कला शिकताना दिसणार असल्याचं जाणवतं. ही कला नेमकी कोणती ते लवकरच समजेल. 'आमचा अभ्यासक्रम इतरत्र कोठेही उपलब्ध नाही', असं गंमतीशीर वाक्यही या पोस्टरवर लिहिलेलं आहे.


लेखन, दिग्दर्शन योगेश देशपांडेंचं

जवळजवळ महिन्याभरापूर्वीच आम्ही एक बातमी दिली होती. ज्यात 'ग्रहण' फेम योगेश देशपांडे दिग्दर्शनाकडं वळल्याचं सांगण्यात आलं होतं. '६६ सदाशिव' हा तोच चित्रपट आहे, ज्याचं दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केलं आहे. '६४ कलांच्या अधिपतीला स्मरून, ६५ व्या जाहिरात कलेच्या उपासनेनंतर, आता सज्ज व्हा... ६६वी कला शिकण्यासाठी! गणपती बाप्पा मोरया!' असं लिहीत योगेश यांनीच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पुणे टॅाकीज प्रा. लि.ची पहिली निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच लेखनही योगेश यांनीच केलं आहे.


वंदना गुप्ते, महेश मांजरेकरही

 योगेशबाबत सांगायचं तर त्यांनी जाहिरात विश्वात बरंच काम केलं आहे. जाहिरातींच्या लेखन-दिग्दर्शनासोबतच त्यांनी 'ग्रहण', 'अवंतिका', 'रेशीमगाठी', 'पिंपळपान' या मालिकांमध्ये अभिनयही केला आहे. '६६ सदाशिव'च्या लेखन-दिग्दर्शनासोबतच त्यांनी या चित्रपटातही अभिनय केला आहे. मोहन जोशी आणि योगेश यांच्या जोडीला वंदना गुप्ते देखील आणि महेश मांजरेकर या चित्रपटात झळकणार असल्याचं माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इतर कलाकारांची नावं अद्याप जाहिर करण्यात आलेली नाहीत. हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.



हेही वाचा-

'रंपाट'मधील कोल्हापूरची मुन्नी पाहिली का?

'बाळा' करणार चौकार-षटकारांची आतषबाजी!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा