'रंपाट'मधील कोल्हापूरची मुन्नी पाहिली का?

म्या मुन्नी... कोल्हापूरची... आतून कणखर आणि बाहेरून कडकड' असे दणकेबाज डायलॅाग म्हणत आपली ओळख करून देणाऱ्या मुन्नीची पहिली झलक नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहे. 'रंपाट'मध्ये मुन्नीच्या भूमिकेत अभिनेत्री कश्मिरा परदेशी दिसणार आहे. '

  • 'रंपाट'मधील कोल्हापूरची मुन्नी पाहिली का?
  • 'रंपाट'मधील कोल्हापूरची मुन्नी पाहिली का?
  • 'रंपाट'मधील कोल्हापूरची मुन्नी पाहिली का?
SHARE

काही दिग्दर्शक इतके पॅाप्युलर असतात की, ते जेव्हा एखाद्या चित्रपटाला सुरुवात करतात तेव्हाच तो सिनेमा लाइमलाईटमध्ये येतो. 'नटरंग'पासून दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर एकापेक्षा एक धडाकेबाज चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधवच्या बाबतीतही असंच घडतं. मागील काही दिवसांपासून रवी 'रंपाट' या आपल्या आगामी मराठी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. रवीच्या 'रंपाट'मधील कोल्हापूरच्या मुन्नीचा तडका तुम्ही पाहिला का?


मुन्नीची पहिली झलक

'म्या मुन्नी... कोल्हापूरची... आतून कणखर आणि बाहेरून कडकड' असे दणकेबाज डायलॅाग म्हणत आपली ओळख करून देणाऱ्या मुन्नीची पहिली झलक नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहे. 'रंपाट'मध्ये मुन्नीच्या भूमिकेत अभिनेत्री कश्मिरा परदेशी दिसणार आहे. 'हिला बघून भल्याभल्याच्या छातीत भरते धडधड!' असं म्हणत कश्मिरानं आपल्या ट्विटरवर 'रंपाट'मधील मुन्नीची पहिली झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे.


१७ मे रोजी प्रदर्शित 

कश्मिरानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आनंद इंगळे आणि वैभव मांगले यांचीही झलक पाहायला मिळते. यावरून या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आनंद आणि वैभवची धमाल कॅामेडी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याची जाणीव होते. 'रंपाट'मध्ये अभिनय बेर्डे साकारत असलेल्या मिथुनची पहिली झलक यापूर्वी रवीनं स्वत: सोशल मीडियावर शेअर केली होती. 'रंपाट'चा नायक अभिनय हा सोलापूरचा आणि नायिका कश्मिरा ही कोल्हापूरची असल्यानं या निमित्तानं प्रेक्षकांना एक वेगळंच रसायन आणि केमिस्ट्री अनुभवायला मिळणार यात शंका नाही. झी स्टुडिओज आणि मेघना जाधव यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
हेही वाचा -

'बाळा' करणार चौकार-षटकारांची आतषबाजी!

'टकाटक' भूमिकेत प्रथमेश परब
संबंधित विषय
ताज्या बातम्या